मन कल्लोळ कल्लोळ

मन कल्लोळ कल्लोळ

जणू सावळा गोंधळ.

कधी निर्मळ निर्मळ

एका क्षणात गढूळ.


खोल  आठवणी किती

जाते खोदत खोदत.

नाही पंख त्याला तरी

कसे जाते रे उडत.


त्याचे हासणे रडणे

क्षणाक्षणाला चालते.

उभा राहुनी समोर

रोज स्वतःला बोलते.


त्याला हजारात पाय

नाही कसलाच मेळ.

भल्याभल्यांना कळेना

त्याचा करामती खेळ.


घेते रूपे कितीतरी

त्याचा तळच घावेना.

असा कसा रे आकार

ते कशात मावेना.


हात टेकले साऱ्यांनी

असे अवघड हे कोडे.

वाट सोडुनी उधळे

जणू बेलगाम घोडे.


साऱ्या मोहाचं हे मुळं

करी शहाण्याला खुळं.

ज्यानं जिंकलं तयाला

त्याची उद्घारली कुळं.


मन कल्लोळ कल्लोळ 

जणू सावळा गोंधळ

कधी निर्मळ निर्मळ

एका क्षणात गढूळ.


कवी: विनोद खटके

9423859438

Comments

  1. साऱ्या मोहाच ते मुळ
    करी शहाण्याला खूळ
    ज्यान जिंकल तयाला
    त्याची उद्धारली कुळ ....

    शब्दच नाहीत विनोद अप्रतिम k@

    ReplyDelete
  2. खूपच अप्रतिम सर 👏👏👏

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर रचना सर !
    मनातील भावनांचे आंदोलन,अतिशय छान प्रकारे चित्रित केले आहे.

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर रचना सर !
    मनातील भावनांचे आंदोलन,अतिशय छान प्रकारे चित्रित केले आहे.

    REPLY

    ReplyDelete
  5. मानवी मनाचे अगदी यथार्थ वर्णन आहे, मन चंचल असते त्याला नियंत्रित करणे गरजेचे आहे, त्यामुळेच आपल्याला सतत प्रयत्न करावे लागते, योग साधना यावर एक विश्वसनीय उपाय आहे.

    ReplyDelete
  6. अगदी चपखल शब्दात मनाचे वर्णन केले आहे सर. सुंदर😊💐
    मन हे एक सगळ्यांना पडलेले अवघड कोडे आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाठ कोरोनाशी लढा मृत्यूशी

लावणी: थंडीचा महिना -विनोद खटके