मन कल्लोळ कल्लोळ
मन कल्लोळ कल्लोळ
जणू सावळा गोंधळ.
कधी निर्मळ निर्मळ
एका क्षणात गढूळ.
खोल आठवणी किती
जाते खोदत खोदत.
नाही पंख त्याला तरी
कसे जाते रे उडत.
त्याचे हासणे रडणे
क्षणाक्षणाला चालते.
उभा राहुनी समोर
रोज स्वतःला बोलते.
त्याला हजारात पाय
नाही कसलाच मेळ.
भल्याभल्यांना कळेना
त्याचा करामती खेळ.
घेते रूपे कितीतरी
त्याचा तळच घावेना.
असा कसा रे आकार
ते कशात मावेना.
हात टेकले साऱ्यांनी
असे अवघड हे कोडे.
वाट सोडुनी उधळे
जणू बेलगाम घोडे.
साऱ्या मोहाचं हे मुळं
करी शहाण्याला खुळं.
ज्यानं जिंकलं तयाला
त्याची उद्घारली कुळं.
मन कल्लोळ कल्लोळ
जणू सावळा गोंधळ
कधी निर्मळ निर्मळ
एका क्षणात गढूळ.
कवी: विनोद खटके
9423859438
🌹👌TU SE GREAT HO👌🌹
ReplyDeleteधन्यवाद
DeleteThanks mama
Delete=rohan
Chan ahe 👌👌
ReplyDeleteमस्तच..
ReplyDeleteमस्तच..
ReplyDeleteमस्त सर
ReplyDeleteमस्त सर👌👌
ReplyDeleteKhup chan 👌
ReplyDeleteKhupch Sundar
ReplyDeleteThanks
Deleteसाऱ्या मोहाच ते मुळ
ReplyDeleteकरी शहाण्याला खूळ
ज्यान जिंकल तयाला
त्याची उद्धारली कुळ ....
शब्दच नाहीत विनोद अप्रतिम k@
Thanks
Deleteखूपच अप्रतिम सर 👏👏👏
ReplyDeleteThanks kiran
Deleteखूपच सुंदर रचना सर !
ReplyDeleteमनातील भावनांचे आंदोलन,अतिशय छान प्रकारे चित्रित केले आहे.
खूपच सुंदर रचना सर !
ReplyDeleteमनातील भावनांचे आंदोलन,अतिशय छान प्रकारे चित्रित केले आहे.
REPLY
Very nice sir
ReplyDeleteThanks
Deleteमानवी मनाचे अगदी यथार्थ वर्णन आहे, मन चंचल असते त्याला नियंत्रित करणे गरजेचे आहे, त्यामुळेच आपल्याला सतत प्रयत्न करावे लागते, योग साधना यावर एक विश्वसनीय उपाय आहे.
ReplyDeleteThanks sir
Deleteअगदी चपखल शब्दात मनाचे वर्णन केले आहे सर. सुंदर😊💐
ReplyDeleteमन हे एक सगळ्यांना पडलेले अवघड कोडे आहे.
Thanks
Delete