Posts

Showing posts from 2021

गाठ कोरोनाशी लढा मृत्यूशी

 *गाठ कोरोनाशी लढा मृत्यूशी*     *✍🏻श्री विनोद खटके✍🏻*  9423859438        आज बरोबर 1 वर्षांपूर्वी मृत्यूच्या दाढेतून सहीसलामत बाहेर पडलो.कुटुंबाची खिळखिळी झालेली इमारत नव्या दमाने पुन्हा बांधली . मरण खूप भेसूर असतं पण मरणाला स्पर्श करून आल्यावर जगणं किती सुंदर आहे याची प्रचिती पूर्वीपेक्षा अधिक येते.या काळात धैर्याची,संयमाची परकाष्ठा करावी लागते,आपलं असणं आणि नसणं याची सीमारेषा अधिक स्पष्ट जाणवू लागते.मनाचा तोल ढासळवणाऱ्या भीतीला जिवाच्या आकांताने पायाखाली घ्यावे लागते.आताशी सूर्य मध्यावर आहे इतक्यात मावळणे मंजूर नाही म्हणून सर्वशक्तीनिशी अशक्त मुठींमध्ये बळ बांधावं लागतं.अंगात जागोजाग उठणाऱ्या वेदनेला आसरा न देता तिला झिडकारून खायला उठणाऱ्या समोरच्या भिंतीवर आपटावं लागतं. वेगानं धडधडणाऱ्या काळजाला संयमाचे धडे द्यावे लागतात तर मलूल आणि त्राण गाळलेल्या देहाला कडाडणाऱ्या चपळ विजेचा परिचय करून द्यावा लागतो.        लहान निरागस लेकरू आणि साठीकडे झुकलेली कोरोनाग्रस्त आई जेव्हा काकुळतीने आणि सैरभैर होऊन निःशब्दपणे आपण बरे ...