लावणी-घायाळ ही हरणी

 असा काळजात लागलाय बाण गं

वटल्या झाडाला फ़ुटलया पान गं

काय केली अशी करणी

सख्या घायाळ मी हरणी ||धृ||

केली घायाळ ही हरणी--कोरस

केली घायाळ ही हरणी--कोरस


साऱ्या देहाची केली पौर्णिमा

तुझ्या प्रीतीची भलतीच नशा

बंद ओठांनं कशी साजना

जगावेगळी मी बोलतेय भाषा.

उलघाल चातकाची तशी 

राया व्याकुळ मी धरणी

झाली घायाळ ही हरणी ||धृ||

केली घायाळ ही हरणी--कोरस

केली घायाळ ही हरणी--कोरस



डोळा डोळ्याला भिडण्याचा गुन्हा

करी वेड्यागत जीव पुन्हा पुन्हा

रात विरहाची जाळतेया कशी

जणू छळतोया रोग बाई जुना.

रान वाफशाला आलं आता

कोऱ्या दिलावर कर पेरणी

झाली घायाळ ही हरणी.||2||

केली घायाळ ही हरणी -- कोरस

केली घायाळ ही हरणी.--कोरस



आली श्वासाला मोगऱ्याची धुंदी

बघ ओझ्यानं वाकलीया फांदी

धीर धरून कुठवर जगू 

जीव झालाय पुरा जायबंदी.

सारी तळमळ आतून 

राया..नाही खोटी वरकरणी.

झाली घायाळ ही हरणी ||3||

केली घायाळ ही हरणी--कोरस

केली घायाळ ही हरणी--कोरस


असा काळजात लागलाय बाण गं

वटल्या झाडाला फ़ुटलया पान गं

काय केली अशी करणी

सख्या घायाळ मी हरणी ||धृ||

केली घायाळ ही हरणी-- कोरस

केली घायाळ ही हरणी--कोरस


कवी:विनोद खटके

9423859438

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गाठ कोरोनाशी लढा मृत्यूशी

मन कल्लोळ कल्लोळ

लावणी: थंडीचा महिना -विनोद खटके