लावणी: थंडीचा महिना -विनोद खटके

 लावणी: थंडीचा महिना


गार गार थंडीचा महिना

गार गार थंडीचा महिना 

आता जीव माझा दमच खाईना

खोटं काळजाला कुठंवर सांगू

माझा साजन अजून येईना.  ||धृ||

हिचा साजन अजून येईना गं----कोरस

हिला उबदार मिठीत घेईना-----कोरस


ही माघाची थंडी विषारी

करी जीवाची तगमग भारी

मूठ झाकली सव्वा लाखाची

चारचौघात सांगायची चोरी

अंगाअंगात भिनल्या विषाचा

तुझ्याबिगर उतारा होईना

माझा साजन अजून येईना  ||१||

 हिचा साजन अजून येईना गं ----कोरस

हिला उबदार मिठीत घेईना.----कोरस


एका नजरेत पाडुनी भूल

या कळीचं केलंस फूल

दोन मनाचे जोड किनारे

सख्या होऊनी आता तू पूल

वाट पाहू मी किती रं राघू

झुरतेय तुझ्यासाठी मैना.

माझा साजन अजून येईना  ||२||

हिचा साजन अजून येईना गं ----कोरस

हिला उबदार मिठीत घेईना.-----कोरस


तुझ्या स्पर्शाने पेटू दे अंग

गाली प्रीतीचा तुझ्याच  रंग

आता सोडून जीवाची पर्वा 

तू दिवा मी झाले पतंग

डोळा मिटेना पहाट झाली

जड पापणी माघार घेईना.

माझा साजन अजून येईना. ||३||

हीचा साजन अजून येईना गं----कोरस

हिला उबदार मिठीत घेईना.-----कोरस

       कवी:विनोद खटके

         9423859438

(कृपया लावणी copy न करता

लिंक Share करावी)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गाठ कोरोनाशी लढा मृत्यूशी

मन कल्लोळ कल्लोळ